देशात कोरोना सर्वाधिक वाढ असलेल्या 19 जिल्ह्यांमध्ये 15 महाराष्ट्रातले

corona
Last Updated: मंगळवार, 16 मार्च 2021 (20:49 IST)
देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. देशभरातील 19 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ होत आहे आणि त्यापैकी 15 हे केवळ महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व 19 जिल्ह्यांमध्ये गेल्या 10 दिवसांत कोरोना संसर्ग सातत्याने वाढत आहे. सोमवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत देशभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दहा दिवसांत देशातील सर्वाधिक रुग्णांची वाढ असलेल्या जिल्ह्यांमध्ये पहिले सात जिल्हे हे महाराष्ट्रात आहेत.
19 जिल्ह्यांपैकी 15 जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये गेल्या दहा दिवसांत दररोज सरासरी 1000 रुग्ण वाढत आहेत.

पुण्यात गेल्या 10 दिवसात एकूण 26,218 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर नागपुरात ही संख्या 20,104 आहे. तिसरे स्थान मुंबईचे आहे, जिथे 10 दिवसांत 11,859 कोविड रुग्णांची वाढ झाली आहे. चौथ्या क्रमांकावर ठाणे जिल्हा आहे,
ठाण्यात 10,914 रुग्ण वाढले आहेत. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव जिल्हे आहेत. गेल्या एका आठवड्यात येथे अनुक्रमे 9,024, 6,652 आणि 6,598 रुग्णांची वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील अमरावती व अहमदनगर दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर आहेत, जिथे अनुक्रमे 4,250 आणि 3,962 रुग्ण वाढले आहेत.

13 व्या स्थानावर मुंबई उपनगरे आहेत. जेथे 3,355 कोरोना रुग्ण वाढले आहेत. 14, 15 आणि 16 व्या स्थानावर यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्हे आहेत. त्यानंतर नांदेड आणि वर्धा जिल्ह्याचा क्रमांक आहे. येथे अनुक्रमे 3,326, 3,299, 3,185, 3,146 आणि 2,431 रुग्णांची नोंद झाली आहे.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं : जितेंद्र आव्हाड

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं : जितेंद्र आव्हाड
मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर ...

मुंबई महानगरपालिकेत भंगार घोटाळा

मुंबई महानगरपालिकेत भंगार घोटाळा
मुंबई महानगरपालिकेत विविध विभागामध्ये जुने निरुपयोगी भंगार सामानाचा लिलाव करण्यासाठी ...

सर्व मंत्रालये आणि केंद्रीय विभागाने Air Indiaचे थकबाकी ...

सर्व मंत्रालये आणि केंद्रीय विभागाने Air Indiaचे थकबाकी त्वरित चुकवावी लागणार : वित्त मंत्रालय
अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या सर्व विभागांना एअर इंडियाची थकबाकी ...

फॅशन उद्योगात Relianceचे आणखी एक पाऊल, भारताचे ट्रेडमार्क ...

फॅशन उद्योगात Relianceचे आणखी एक पाऊल, भारताचे ट्रेडमार्क अधिकार Lee Cooperसाठी विकत घेतले
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने मनीष मल्होत्रा आणि रितू कुमार यांच्यासोबत भागीदारी ...

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी ...

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी दुपारी युक्तिवाद
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी असलेले आर्यन, अरबाज आणि मूनमूनचा युक्तीवाद मुंबई उच्च ...