शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2015
Written By
Last Modified: मेलबर्न , बुधवार, 4 फेब्रुवारी 2015 (14:43 IST)

जेम्स फॉकर सलामीच्या सामन्यास मुकणार

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनर याला दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतील सलामीच्या लढतीस मुकावे लागणार आहे. फॉकनर याचे इंग्लंडविरुद्ध तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात पायाचे स्नायू दुखावले होते. यामुळे त्याला अर्धवट षटक सोडून मैदानाबाहेर जावे लागले होते. या सामन्यात फॉकनरने अष्टपैलू कामगिरी केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, फॉकनरच्या उजव्या पायाचे स्नायू दुखावल्याचे स्कॅन केल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

त्याच्यावर पुढील दोन आठवडे उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे तो विश्वकरंडक स्पर्धेत सलामीला इंग्लंडविरुद्ध होणार्‍या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.