शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2015
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2015 (11:34 IST)

टीम इंडिापुढे जगज्जेतेपद राखणचे कठीण आव्हान

यंदाची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिा-नूझीलंडमध्ये खेळली जाणार आहे. येथील खेळपट्टय़ा वेगवान आहेत. त्यामुळे टीम इंडिाची या स्पर्धेत जणू कसोटीच लागणार आहे. 2011 मधील स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावून देशवासिांचे स्वप्न पूर्ण केले होते. महेंद्रसिंग धोनी याचे कल्पक नेतृत्व, युवराजसिंगची अष्टपैलू खेळी, सचिनने दिलेली संयमी साथ यामुळे भारतीय संघ जगज्जेता झाला होता. आता 2015 मधील परिस्थिती खूप बदलली आहे. भारतीय फलंदाज वेगवान खेळपट्टय़ांवर नांगी टाकतात, हा इतिहास नाकारून चालणार नाही. दरम्यान विश्वचषकाच्या तोंडावर कसोटी मालिका आणि तिरंगी स्पर्धेत भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. यामुळे जगज्जेतेपद राखण्याचे कठीण आव्हान भारतीय संघासमोर आहे.
 
भारतीय संघातील सलामीवीर शिखर धवन हा बॅड पॅचमधून जात आहे. त्याचा हरवलेला फॉर्म संघासाठी चिंताजनक आहे. हाच शिखर भारतीय खेळपट्टय़ांवर शेर बनून खेळतो तर विदेशात अत्यंत सहजतेने आपली विकेट देतो. त्याने चांगली सलामी दिली तर संघ मोठी धावसंख्या रचू शकतो. यासाठी त्याने संयम बाळगणे आवश्क आहे. बाहेरून जाणार्‍या चेंडूला कट करण्याची सवय मोडावी लागेल. या मोहापायी त्याचा अनेकवेळा बळी गेला आहे.
 
अजिंक्य राहाणे सध्या फॉर्मात आहे. मात्र सातत्य टिकविण्यात त्याला अपयश आले आहे. आयपीएलमध्ये धावांचा डोंगर रचणारा अजिंक्य  वनडेत मात्र अपयशी का ठरतो हा संशोधनाचा विषय आहे. वनडेमध्ये दोनवेळा द्विशतक करणार्‍या रोहित शर्माकडे सर्वाचे लक्ष आहे. विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिाविरुध्द झालेल्या कसोटी सामन्यात त्याने वेगवान खेळपट्टय़ांवर जिगरबाज खेळी करून भरीव योगदान दिले. भारताप्रमाणे विदेशातही आपण यशस्वी होतो हे त्याने बॅटद्वारे दाखवून दिले आहे. 

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताची सर्व मदार विराट कोहलीवर असेल. विराटने पुन्हा चांगली खेळी केल्यास टीम इंडिया उत्कृष्ट कामगिरी करू शकेल. गेल्या वर्ल्डकपमध्ये महेंद्रसिंग धोनीने मॅचविनिंग खेळी केली होती. मात्र सध्या त्याचा फॉर्म हरवलेला आहे. यामुळे त्यालादेखील मैदानावर टिकून खेळणे आवश्क आहे. सर्व दडपण दूर करून योग्य फटके मारल्यास तो  मोठी खेळी करू शकेल.
 
अक्षर पटेलचा हा पहिलाच वर्ल्डकप आहे. फिरकीपटू आणि चांगला फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. अनुभव नसला तरी त्याच्यातील  जिद्द कौतुकास्पद आहे. याचबरोबर स्टुअर्ट बिन्नी, आर आश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, महंमद शमी, उमेश यादव यांनाही जबाबदारीने खेळावे लागेल. गोलंदाजीचा विचार करता भारतीय संघ अत्यंत कमकुवत वाटतो. उमेश यादव, शमी, इशांतकुमार हे स्वैर मारा करतात. या वेगवान गोलंदाजाच्या कामगिरीवर टीम इंडिाचे भविष्य अवलंबून आहे. 2011 मध्ये विश्वचषक जिंकल्यामुळे पुन्हा एकदा जगज्जेते होण्याचा दबाव या संघावर आहे. आर. आश्विन, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा या फिरकीपटूंनाही योग्य मारा करावा लागेल. खेळपट्टय़ा वेगवान असल्यामुळे फिरकीपटूंची पिटाई होण्याची शक्यता आहे. याचे भान त्यांना ठेवावे लागेल. साखळी सामन्यात भारताची गाठ पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज या बलाढय़ संघाशी पडणार आहे.

प्लस पॉईंट 
भारती संघातील अजिंक्य राहाणे, विराट कोहली, अक्षर पटेल हे खेळाडू फॉर्मात आहेत. भुवनेश्वर कुमारसुध्दा चांगली गोलंदाजी करत आहे. अशा खेळपट्टय़ांवर खेळण्याचा धोनीचा अनुभव दांडगा आहे. योग्य रणनिती आखल्यास टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पिन बनू शकतो.

मायनस पॉईंट 
भारताचा सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायडू, सुरेश रैना, धोनी हे खेळाडू खराब फॉर्मात आहेत. याशिवाय भारतीय गोलंदाजी म्हणावी तितकी भेदक नाही, याचा लाभ प्रतिस्पर्धी संघाला होऊ शकतो. भारताचे क्षेत्ररक्षणही गचाळ आहे.