शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2015
Written By
Last Modified: दिल्ली , गुरूवार, 5 फेब्रुवारी 2015 (11:54 IST)

धोनीच देऊ शकतो भारताला विश्वचषक : इंझमाम

भारताला विश्वचषक मिळवून देण्याची क्षमता कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडेच आहे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल-हक व शोएब अख्तर यांनी व्यक्त केले. या स्पर्धेत धोनीकडे संघाचे नेतृत्व असणे ही जमेची बाजू आहे. दडपणाखाली चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेला कर्णधार भारतीय संघाकडे असल्याने तोच भारताला पुन्हा एकदा विश्वचषक मिळवून देऊ शकतो, असे मत इंजमाम आणि शोएबने व्यक्त केले आहे.