रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : शनिवार, 11 डिसेंबर 2021 (17:50 IST)

गुरूचरित्र – अध्याय बेचाळीसावा भाग 2

श्रीगुरु म्हणती द्विजासी । आजि व्रतचतुर्दशी । पूजा करीं अनंतासी । समस्त द्विज मिळोनि ॥१॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु । आमुचा अनंत तूंचि गुरु । व्रतसेवा तुमचे चरण ॥२॥
तये वेळीं श्रीगुरु । सांगतां झाला विस्तारु । कौंडिण्यमहाऋषीश्वरु । केलें व्रत प्रख्यात ॥३॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु । कैसें व्रत आचरावें साचारु । पूर्वीं कोणी केलें असे ॥४॥
ऐसें व्रत प्रख्यात । व्रत दैवत अनंत । जेणें होय माझें हित । कथामृत निरोपिजे ॥५॥
येणें पुण्य काय घडे । काय लाभतसे रोकडें । ऐसें मनींचें साकडें । फेडावें माझें स्वामिया ॥६॥
ऐसें विनवीतसे द्विजवरु । संतोषोनि गुरु दातारु । सांगते झाले व्रताचारु । सिद्ध म्हणे नामधारका ॥७॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधरु । सांगे गुरुचरित्रविस्तारु । ऐकतां भवसागरु । पैल पार पाववी श्रीगुरु ॥८॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीयात्रा समस्त करीत । श्रोते ऐकती आनंदित । तेणें सफल जन्म होय ॥९॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । सांगतसे नामधारक विख्यात । जेणें होय मोक्ष प्राप्त । द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥२१०॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीक्षेत्रमहिमावर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥४२॥
 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ओसंख्या ॥२१०॥
 
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥