मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (13:01 IST)

Devuthani Ekadashi 2021 देवउठनी एकादशी कधी आहे ? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Dev Uthani Ekadashi 2021 Date पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी देवउठनी एकादशी या नावाने ओळखली जाते. पंचांगानुसार 14 नोव्हेंबर 2021, रविवारी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे. याला देव प्रबोधिनी एकादशी आणि देवोत्थान एकादशी असे देखील म्हटलं जातं.
 
चातुर्मास महिना संपत आहे Chaturmas 2021
सध्या चातुर्मास सुरू आहे. पंचांगानुसार, चातुर्मास 20 जुलै 2021 रोजी सुरू झाला. चातुर्मासात कोणतेही शुभ व मंगळ कार्य केले जात नाही. चातुर्मास 14 नोव्हेंबर 2021 ला देवउठनी एकादशीला संपेल. भगवान विष्णू चातुर्मासात विसावतात असे मानले जाते. ज्या दिवशी भगवान विष्णूचा निद्राकाळ सुरू होतो, त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. दुसरीकडे, ज्या दिवशी भगवान विष्णूचा निद्राकाळ संपतो, त्या दिवशी येणार्‍या एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतात. भगवान विष्णूचा निद्राकाळ संपताच शुभ आणि मंगळ कार्ये सुरू होतात.
 
तुलसी विवाह 2021 Tulsi Vivah 2021
देवउठनी एकादशी तिथीला तुळशी विवाहाचे आयोजन केलं जातं. यादिवशी तुळस आणि शालिग्राम यांचा विवाह लावला जातो. तुळस भगवान विष्णूंना पिरय आहे आणि तुळस अत्यंत पवित्र मानली गेली आहे.
 
देवउठनी एकादशी महत्व Dev Uthani Ekadashi Importance
सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. एकादशी व्रताचे वर्णन महाभारताच्या कथेतही आढळते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले. यानंतर युधिष्ठिराने एकादशीचे व्रत विधिवत पूर्ण केले. एकादशी व्रताने पापांपासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात.
 
देव उठनी एकादशी 2021 शुभ मुहूर्त Dev Uthani Ekadashi 2021 Shubh Muhurat
एकादशी तिथी प्रारम्भ- 14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 05 वाजून 48 मिनिटापासून
एकादशी तिथी समाप्त- 15 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 06 वाजून 39 मिनिटापर्यंत