सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (09:57 IST)

राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन कधी साजरा केला जातो, जाणून घ्या 11 विशेष आयुर्वेदिक उपचार

दर वर्षी आयुष मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन धन्वंतरी जयंती म्हणजेच धनतेरसच्या दिवशी साजरा केला जातो. आयुर्वेदिक औषधे आरोग्याच्या समस्यांवर फायद्याचा असतात. कारण ही चिकित्सा नैसर्गिक असते आणि आजाराला मुळापासून नायनाट करण्यात सक्षम असते. 
 
वर्ष 2016 पासून दर वर्षी धन्वंतरी जयंतीच्या दिवशी आयुर्वेदिक दिन साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी 2020 मध्ये देखील हा 13 नोव्हेंबर 2020 रोजी साजरा केला जाणार आहे.
 
भारतीय पौराणिक दृष्टीने धनतेरस हे आरोग्याचे देवाचा दिवस म्हणून ओळखतात. भगवान धन्वंतरी हे आरोग्य, वय, आयुष्य आणि तेजाचे आराध्य देव आहे. भगवान धन्वंतरी आयुर्वेद युगाचे प्रणेते आणि वैद्यक शास्त्राचे देव मानले जाते. प्राचीन काळात आयुर्वेदाची उत्पत्ती ब्रह्मानेच केली असे मानतात. आदिकालखंडातील ग्रंथांमध्ये रामायण आणि महाभारत सारख्या विविध पुरांणाची रचना केली आहेत. या सर्व ग्रंथांमध्ये भगवान धन्वंतरीचा उल्लेख आयुर्वेदिक संदर्भात केला गेला आहे. 
 
चला जाणून घेऊ या आरोग्यविषयक समस्यांसाठी 11 आयुर्वेदिक उपचार.
 
1 कफ बरोबर खोकला झाला असल्यास - कफ केयर सरबत वासा, वासवलेह, वासावरीष्ट, खदिरादी वटी, मारिचादी वटी, लवंगादि वटी, त्रिकुट चूर्ण, द्राक्षारिष्ट, एलादि वटी, कालिसादी चूर्ण, कफसेतु रस, अभ्रक भस्म, शृंगारभ्र रस, बबूलारिष्ट हे सर्व फायदेशीर आहे.
 
2 अधिक ताप किंवा मलेरियाच्या स्थितीमध्ये - महासुदर्शन चूर्ण, महासुदर्शन काढा, अमृतारिष्ट, ज्वरांकुश रस, सत्वगिलोय, विषम ज्वरांतक लोह औषधांचा सेवन करणं अत्यंत प्रभावी आहे.
 
3 इन्फ्लूएंझा किंवा ताप असल्यास - त्रिभुवन कीर्तीरस, लक्ष्मी विलास रस, संजीवनी वटी, पिंपळ 64 प्रहरी आणि अमृतारिष्टचे सेवन करू शकतात. या मुळे आपण तापाला मुळापासून दूर करू शकता.
 
4 टीबी किंवा क्षय रोग असल्यास - स्वर्ण वसंत मालती, लक्ष्मी विलास रस, मृगांक रस, वृहत शृंगारभ्र रस, राजमृगांकरस, वासवलेह द्राक्षासव, च्यवनप्राश अवलेह, महालक्ष्मी विलास रसाचे सेवन फायदेशीर आहेत.
 
5 दमा किंवा श्वसन रोगामध्ये - कफ केयर, च्यवनप्राश अवलेह, सितोपलादी चूर्ण, श्वासकास, चिंतामणी कनकासव, सरबत वासा, वासारिष्ट, वासावलेह, मयूर चंद्रिका भस्म, अभ्रक भस्म तेल इत्यादी फायदेशीर ठरतील.
 
6 डोकेदुखी, अस्वस्थता आणि तहान जाणवल्यावर - जर आपण उष्णतेमुळे मन आणि मेंदूची समस्या, तसेच डोकेदुखी, अस्वस्थता आणि तहान लागणे सारख्या त्रासाला अनुभवत असल्यास, तर हृदय आणि मेंदूला शांती देऊन ऊर्जा देण्यासाठी आयुर्वेदाचे हे औषध आपल्यासाठी फायदेशीर आहे- गुलकंद प्रवाळयुक्त, मोती पिष्टी, खमीरा संदल, सरबत संदल, सरबत डाळींबी, याचे सेवन आपण प्रत्येक हंगामात करू शकता.

7 एग्झिमा झाल्यास - चर्म रोगांतक मलम, गुडूच्यादि तेल, रस माणिक्य, महामरीचादी तेल, गंधक रसायन, त्रिफळा चूर्ण, पुभष्पांजन, रक्त शोध, खदिरादीष्ट, महामंजिष्ठादी काढा, इत्यादींचे सेवन करावे.

8 त्वचेचे आजार किंवा रक्तविकार असल्यास - रक्त शोधक, खदिराष्टि, महामंजिष्ठादि काढ़ा, सारिवाद्यासव, महामरिचादि तेल, रोगन नीम, गंधक रसायन, केशर गूगल, आरोग्यवर्द्धनी, जात्यादि तेल, चर्मरोगांतक मलम, पुष्पांजन इत्यादी वापरणे श्रेयस्कर आहे.
 
9 केसांचे रोग असल्यास - महाभृंगराज तेल, हस्तिदंतमसी, च्यवनप्राश अवलेह, भृंगराजसव केसांची गळती आणि पांढऱ्या केसांची समस्याला कमी करण्यास फायदेशीर आहे.
 
10 फुफ्फुसात पाणी भरल्यावर - नारदीय लक्ष्मी विलास रस, स्वर्ण वसंत मालती, मृगश्रृंग भस्म, रस शेंदूर उचकी लागल्यावर हिक्का सूतशेखर स्वर्णयुक्त, मयूर चंद्रिका भस्म, एलादि वटी चूर्णाचे सेवन करू शकतात.
 
11 कुष्ठ रोग किंवा पांढरे डाग असल्यास - सोगन बावची, खदिरादिष्ट, आरोग्यवर्द्धिनी वटी, रस माणिक्य, गंधक रसायन, चालमोगरा तेल, महामंजिष्ठादि क्वाथ फायदेशीर आहे.