व्यक्तिविशेष : दिलीप पुरुषोत्तम चित्रे
17
सप्टेंबर 1938 रोजी बडोदा येथे जन्मलेले दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे स्वातंत्र्योत्तर काळातील एक प्रभावी व प्रयोगशील नवकवी, कथाकार, समीक्षक व विचारवंत म्हणून ओळखले जातात.भोवतालचे समाजजीवन, भाषा यातून प्राप्त होणारे परंपरेचे संचित, वाङ्मयीन रूपसंकल्पना नाकारणारा हा कवी इथिओपियात 3 वर्षे शिक्षक आणि नंतर इंडियन एक्सप्रेसच्या कलाविभागात अधिकारी होता. आपल्या वेगळेपणाची, जीवनातील असंबद्धतेची जाणीव, मृत्यूची अटळता आणि जबर जीवनेच्छा यांच्याबरोबरच भेडसावणारे एकाकीपण त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. त्यांच्या कवितेत ऐंद्रिय संवेदना व प्रेमाला महत्त्व दिल्याचे जाणवते. मराठीतल्या ‘शब्द’ ह्या पहिल्या अनितकालिकाचे प्रवर्तक असणार्या चित्रे यांनी ‘आधुनिक कवितेला सात छेद’, ‘शतकाचा संधिकाल’ अशा लेखमाला लिहिल्या. ‘कविता’, ‘पुन्हा कविता’ असे काव्यसंग्रह लिहिले. ‘सफायर’,‘रुधिराक्ष’ या लघुकादंबर्यांबरोबरच तुकारामांच्या निवडक अभंगांचा आणि ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा इंग्रजी अनुवाद केला.