शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

बदामाचे सरबत

साहित्य: बदाम, खसखस, बडीशेप, वेलदोडे, काळेमिरी, कलिंगडाच्या बिया, दूध, साखर, रोज इन्सेस, केशर.
 
कृती: बदाम पाच-सहा तास भिजत घालून त्याची साले काढून बारीक वाटून घ्यावे. खसखस, कलिंगडाच्या बिया भिजत बारीक वाटून घ्यावे. बडीशेप, काळेमिरे घालून बारीक वाटून घ्यावे. सर्व वस्तू एकत्र करून पाणी घालून पुन्हा मिक्सरवर बारीक करावे. मलमलच्या कपडय़ाने ते गाळून घ्यावे. नंतर त्यात साखर मिसळलेले दूध व रोज इन्सेस, बारीक केलेले केशर मिसळावे. फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे. काचेच्या ग्लासमध्ये थंड सरबत सर्व्ह करावे.