रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

रताळ्याचे बटरमिल्क शेक

WD
साहित्य : 2-3 लाल मध्यम आकाराची रताळी, 2 ग्लास गोड ताक, 1/2 वाटी साखर, 1 चमचा वेलची पूड, 2-3 काड्या केशर, चिमटभर मीठ.

कृती : सर्वप्रथम थोडे मीठ घालून रताळी कुकरमध्ये छान उकडून घ्यावी. उकडलेली रताळी गार करून, सोलून, कुस्करून घ्यावी. मिक्सरमध्ये कुस्करलेली रताळी, ताक, साखर, वेलची पूड, केशर, मीठ एक‍ि घालून मिल्कशेकसारखे घट्ट करावे. हवे असल्यास अजून तोडी साखर घालावी. फ्रिजमध्ये गार करून सर्व्ह करावे. उपवासासाठी हे वेगळे आणि उत्तम पेय आहे.