रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

कोकम सूप

ND
साहित्य : 5-6 कोकणी आमसूल, 2 चमचे साखर, पाव चमचा मीठ, तिखट अर्धा चमचा, 1 चमचा तूप, 1 चमचा जिरे.

कृती : 2 कप पाण्यात स्वच्छ धुतलेली आमसुले उकळावीत. नंतर थंड झाल्यावर गाळणीने गाळावीत. त्यात तिखट, मीठ, साखर मिसळून तुपाची जिरे घातलेली फोडणी द्यावी व गरम सूप सर्व्ह करावे. हे सूप गार द्यावयाचे असेल तर त्यात अर्धा कप ताप घालून मिसळून द्यावे. तयार केलेले सूप वरणातही टाकून वरणाला फोडणी देऊन आंबटगोड वरण जेवताना घेता येते.