रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

तरबूजचे (कलिंगड मॉकटेल)

WD
साहित्य : एक बाऊलभर तरबूजचे तुकडे, अर्धी बाटली लिंबका, दोन टेबलस्पून शुगर सिरप, दोन टेबलस्पून व्हॅनिला आईस्क्रिम, पाच ते सहा बर्फाचे क्यूबस्. (शुगर सिरपसाठी अर्धी वाटी साखर, पाव वाटी पाणी.)

कृती : प्रथम शुगर सिरप बनवून घेणे. त्यासाठी एका भांडय़ात साखर व पाणी मिक्स करून गॅसवर सतत एक ते दोन उकळ्या येईपर्यंत ढवळणे नंतर गॅस बंद करणे, गाळून थंड होऊ देणे. दोन मिनिटांत शुगर सिरप तयार होते.

नंतर कलिंगडचे तुकडे मिक्सरमध्ये काढून त्याचा ज्यूस करून गाळून घेणे. अर्धी बाटली लिंबका एका ग्लासमध्ये ओतून त्याचा गॅस जाऊ द्यावा. व्हॅनिला आईस्क्रिम मेल्ट होऊ देणे.

सर्व्ह करण्यापूर्वी कलिंगड ज्यूस, शुगर सिरप, आईस्क्रिम, लिंबका, बर्फ घालून हॅन्डमिक्सरने अगदी थोडेसे चर्न करणे व लगेचच ग्लासमध्ये ओतणे म्हणजे त्यावर छान फेस येतो. अशा प्रकारे हे कलिंगड मॉकटेल तयार होते.