1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रहण
Written By वेबदुनिया|

सूर्यग्रहणाचा राशींवरील प्रभाव

पं आनंद अवस्थी

NDND
ग्रहण हे एका वर्षात कमीत कमी दोन व जास्तीत जास्त सात वेळा येत असते. तसे पाहिले तर सूर्यग्रहण पाच व चंद्रग्रहण दोनदा येत असते. कधी-कधी तर सूर्यग्रहण चार वेळा व चंद्रग्रहण तीन वेळा येत असते. अशा प्रकारे एका वर्षात दोन ग्रहणे येतात. तीही सूर्यग्रहणे असतात. 22 जुलै रोजी खग्रास सूर्यग्रहण आहे.

सूर्यग्रहण श्रावण महिन्यात कृष्ण अमावस्या बुधवार दि. 22 जुलै, 09 रोजी पुण्य नक्षत्र तसेच कर्क राशीवर लागणार आहे. हे सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. ग्रहणास सकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी प्रारंभ होईल. 6 वाजून 56 मिनिटाला मध्यस्थितीत तर 7 वाजून 25 मिनिटाला ग्रहण समाप्त होईल. भारतात सूरत, अरूणाचल प्रदेश, अलाहाबाद, पाटणा, गया, दार्जिलिंग येथे सूर्यग्रहण दिसणार आहे.

सूर्यग्रहणाचा राशींवर पडणारा प्रभाव-
मेष- मानसिक चिंता त्रास देईल. व्यापार्‍यांसाठी चांगला योग आहे.
वृषभ- अनुकूल स्थिती, मनोकामना पूर्ण होऊन धनलाभ होईल.
मिथून- यादिवशी घेतलेले निर्णय योग्य ठरणार नाही. तसेच सरकारी कामकाजात अडचणी येतील. तसेच मोठे नुकसान होईल.
कर्क- मध्यम स्थिती राहील. एखाद्या गोष्टीविषयी विनाकारण चिंता लागून राहिल. तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह- अनिष्ट स्थिती राहिल. धनहानी होईल.विनाकारण चिंता लागून राहील. कायदेविषयक कामात अडचणी येतील.
कन्या- अनुकूल स्थिती असल्याने धन लाभ संभवतो. नव्या नोकरीचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल.
तुळ- कौटुंबिक सहकार्य राहिल. चांगला जीवनसोबती मिळेल. मनाप्रमाणे फळ मिळेल.
वृश्चिक- कौटुंबिक सहकार्य लाभणार नाही. तसेच मानपानाची अपेक्षा ठेऊ नका. सबुरी ठेवा.
धनू- मानसिक तनाव राहिल. विनाकारण धावपळ होईल. आपल्या व्यक्तीकडून विरोध होईल. कष्ट वाढतील.
मकर- कष्ट करावे लागतील. नवीन कार्याला सुरवात. आर्थिक पाठबळ राहिल.
कुंभ - चांगली वार्ता, धन लाभ, घर वा वास्तु बांधाल. जवळच्या व्यक्तीकडून सहकार्य मिळेल.
मीन- पाण्यापासून भीती. आजाराची चिंता सतावेल.