शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By भाषा|

भाजपने फोडले उमेदवार निवडीवर पराभवाचे खापर

राजस्थानमध्ये चुकीच्या उमेदवारांना निवडणुकीत उतरवल्यानेच पराभव पत्करावा लागला, अशी मखलाशी भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. वसुंधरा राजेंचा एककल्लीपणा भाजपला या निवडणुकीत लढल्याचे बोलले जाते. उमेदवार निवडीची सर्व प्रक्रिया वसुंधरा राजेंनी आपल्या हातात ठेवली होती.

जावडेकर म्हणाले, की राजस्थानातील उमेदवार निवडीबाबत खूप घोळ घातला गेला. त्यामुळे निवडणूक प्रचार उशीरा सुरू झाला आणि त्यामुळेच पराभव पत्करावा लागला. शिवाय स्थानिक मुद्यांवरही भाजपची कोंडी झाली.

निवडणूक निकालांवर अनेक मुद्यांचा प्रभाव पडतो, असे सांगताना ते म्हणाले, दहशतवाद या निवडणुकीचा मुद्दा नव्हता. उलट यावेळी महागाई, सुरक्षितता, विकास हे मुद्दे होते. याच आधारे भाजपने मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये विजय मिळवला. दिल्लीत गेल्यावेळेपेक्षा चांगली कामगिरी केली.

दिल्लीत कॉंग्रेसच्या शीला दीक्षितांनी हॅटट्रिक केली आणि भाजपमध्ये पराभवाची कारणे सांगण्याचा शोध घेतला जात आहे. प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी या निवडणुकीत स्थानिक मुद्यांचाच प्रभाव राहिला असे मान्य केले.