मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By भाषा|

आयोगाच्या संकेतस्थळावर ट्रॅफिक जॅम

निवडणूक निकाल जाणून घेणार्‍यांची गर्दी वाढल्याने निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आज अक्षरश: 'ट्रॅफिक जाम' झाले आहे. राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि मिझोरम या पांच राज्यामधील विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर होत आहेत.

इच्छूकांनी आयोगाच्या संकेतस्थळावर (www.Eci.Gov.In) तोबा गर्दी केल्याने दूपारी १२ नंतर फक्त 'ट्रफिक जॅम' एवढाच संदेश दिसत होता. आयोगाचे संकेतस्थळ एकाचवेळेस जास्तीत जास्त ३०,००० दर्शक हाताळू शकते.

संकेतस्थळ प्रत्येक सेकंदास १०० मेगाबाइट बँडविड्थ सर्पोट लाइनने सज्ज आहे. मात्र आज पाचही राज्याचे निकाल एकाचवेळेस अपडेट करण्यात येत असताना संकेतस्थळावर ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यामुळे तांत्रीक अडचणी येत असल्याचे समजते.