शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By वेबदुनिया|

छत्तीसगडमध्ये चुरशीची लढत

छत्तीसगड विधानसभा निवडणुकांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत अत्यंत चुरशीची लढत होत असून, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कॉग्रेस आणि भाजपात काट्याची टक्कर होत आहे.

राज्यातील 90 पैकी 80 जागांवर मतमोजणीचे ताजे निकाल मिळत असून, यात 44 जागांवर भाजपा तर 40 जागांवर कॉग्रेसने आघाडी घेतली आहे.

मुख्यमंत्री डॉ. रमनसिंह राजनंदगाव मतदार संघातून 4500 मतांनी तर माजी मुख्यमंत्री आणि कांग्रेस उमेदवार अजित जोगी मरवाही मतदार संघातून 3200 मतांनी आघाडीवर आहेत.

महसूल मंत्री बृजमोहन अग्रवाल रायपुर तर विधानसभा अध्यक्ष प्रेमप्रकाश पाण्डेय भिलाई मतदार संघात आघाडीवर आहेत. अजित जोगींच्या पत्नी रेणू जोगी कोटात तर भाजपाचे संतोष बाफना जगदलपुर मधून आघाडीवर आहेत.