मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 8 डिसेंबर 2008 (16:32 IST)

निकाल अपेक्षितच, दिल्लीत धक्का: राजनाथ

पाच राज्यातील निवडणूक निकाल निराशाजनक नसून पक्षाकडून कॉंग्रेसकडे फक्त एकज राज्य गेल्याचे भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

मात्र दिल्लीत पक्षास बहुमत अपेक्षित होते, मात्र येथील निकाल आश्चर्यकारक ठरले असे ते म्हणाले. दिल्लीत कॉंग्रेस विजयी हॅट्रीक साधत आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पक्षाने सत्ता राखल्याने एकंदरीत चांगला कामगिरी राहिली आहे.

भाजपास फक्त राजस्थान गमवावे लागले आहे. दिल्लीत स्थानिक प्रश्न महत्त्वपूर्ण ठरले असून मतदारांनी कुणाला निवडून द्यायचे याबाबत अगोदरच मत निश्चित केले होते, असेही ते म्हणाले. मात्र राजस्थानातील निकाल अनपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.