मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By भाषा|
Last Updated : सोमवार, 8 डिसेंबर 2008 (17:22 IST)

मिझोरममध्ये कॉंग्रेसला साधे बहुमत

मिझोरममध्ये सरकारविरोधी जनमताच्या लाटेवर स्वार होत कॉंग्रेसने ४० सदस्यीय विधानसभेत २१ जागा पटकावून बहुमत प्राप्त केले आहे. पक्षाचे दोनवेळ मुख्यमंत्री राहिलेले लालथनहावला हे दोन्ही जागांवर निवडून आले आहेत.

सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला कॉंग्रेसने धूळ चारली असून मुख्यमंत्री झोर्माथांगा यांचा बालेकिल्ला उत्तर चाम्पाही मतदारसंघातून जबर पराभव झाला आहे.

मावळत्या ४० सदस्यीय विधानसभेत मिझो नॅशनल फ्रंटचे २१ सदस्य होते. यूडीएने ह्रांगतुर्झो मतदारसंघातून विजय प्रात करत खाते उघडले आहे.