मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By वार्ता|

मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीचे कॉंग्रेसचे संकेत

पाच राज्यांच्‍या विधानसभा निवडणुकीत चांगला निकाल हाती आल्‍याने कॉंग्रेसने मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीचे संकेत दिले असून या संदर्भात पक्षाच्‍या बैठकीत विचार केला जाण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे.

कॉंग्रेसचे माध्‍यम विभागाचे प्रमुख वीरप्पा मोइली यांनी निवडणुकांसंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले, की दिल्लीत समाधानकारक विजय मिळविल्‍यानंतर जनता कॉंग्रेसच्‍या पाठीशी असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले असून त्‍यामुळे लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते.