मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By भाषा|
Last Modified: सोमवार, 8 डिसेंबर 2008 (16:32 IST)

लोकसभेत कॉंग्रेसला रोखणे अशक्य: मोईली

लोकसभा निवडणूकत कॉंग्रेसला परत सत्तेत येण्यापासून रोखणे शक्य नसल्याचे पक्षाने म्हटले आहे. राजस्थान, दिल्ली आणि मिझोरममध्ये कॉंग्रेसने सत्तेकडे वाटचाल केल्याने पक्षात जान फुंकल्या गेली आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विजयश्री खेचण्याबाबत पक्षास आत्मविश्वास असल्याचे प्रवक्ते एम विरप्पा मोईली यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र लोकसभा निवडणूका नियोजित वेळेतवरच घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पांच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालातून भाजप सामन्यजनांच्या आशा आणि आकांक्षापूर्तीत अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते. याचसोबत जनतेसाठी काम केलेल्या पक्षावर लोकांनी विश्वास व्यक्त केल्याचेही ते म्हणाले.