मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. इव्हेंट वार्ता
Written By वेबदुनिया|

इंटरनेटवरील मराठी जगताने हरखले औरंगाबादकर

वेबदुनियाचा प्रचार औरंगाबादमध्ये जोरात सुरू असून शुक्रवारी (ता.१) विविध शाळा महाविद्यालये तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ही मोहिम राबविण्यात आली. औरंगाबादकरांनी अतिशय उत्सुकतेने वेबदुनियाविषयीची माहिती घेण्यात रस दाखविला.

सकाळी सिडकोतील बळिराम पाटील कनिष्ठ महाविद्यालय व ज्ञानेश्वर विद्यामंदिरात वेबदुनियाविषयीची माहिती देण्यात आली. या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेण्यात अतिशय उत्सुकता दर्शवली. वेबदुनियाच्या प्रचारकांनी त्यांच्या शंकांचेही निरसन केले. वेबदुनियाच्या मराठी ई-मेल सेवेवर तर विद्यार्थी बेहद्द खुश झाल्याचे दिसले.

दुपारच्या सत्रात छावणी भागात डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात घेतलेले प्रचारसत्रही चांगलेच रंगले. विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला वेबदुनियाच्या प्रचारकांनीही दाद दिली. वेबदुनियाच्या आयटी, करीयर आदी विभागाची माहिती घेण्यात विद्यार्थ्यांनी रस घेतला. ई-मेल, क्वेस्ट या सेवांबद्दल त्यांनी उत्सुकता दाखवली.

यानंतर संध्याकाळी टिव्ही सेंटर, निराला चौक व कालडा कॉर्नर या भागात नागरिकांना वेबदुनियाची माहिती देण्यात आली. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.