नागपुरात मतदान शांततेतःगुरुवारी मतमोजणी
- नितिन फलटणकर
नागपूर पदवीधर मतदार संघासाठी तब्बल 12 वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत एकूण 52 टक्के मतदान झाले. सुमारे दहा मतदारांनी या निवडणुकीत आपले नशीब अजमावले असून कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नीतिन गडकरी आणि आघाडीचे डॉ बबनराव तायवाडे यांच्यात सरळ लढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदार संघात गडकरी यांचाच बोलबाला राहिला आहे. काल झालेल्या निवडणुकीत विदर्भातील 256 बूथवर सुमारे दोन लाखांहून अधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणुकही कालच पार पडल्याने विदर्भात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता गुरुवारी नागपुरात मतमोजणी होणार असून याचा निकाल दुपारपर्यंत लागण्याची शक्यता आहे.