वेबदुनिया आता आपल्या शहरात
मराठी.वेबदुनिया.कॉम या संकेतस्थळाने एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आता हे संकेतस्थळ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेबदुनियाने अवघ्या महाराष्ट्रभर प्रसिद्धी मोहिम आखली असून याचा शुभारंभ दिनांक १४ जुलैपासून (सोमवार) राज्याची उपराजधानी नागपूरपासून होणार आहे. मराठी वेबदुनिया हे मराठीतील एक अव्वल संकेतस्थळ म्हणून आज ओळखले जाते. अवघ्या एका वर्षात या संकेतस्थळाने हा पल्ला गाठला आहे. वस्तुनिष्ठ बातम्यांबरोबरच दर्जेदार इतर मजकूर ही वेबदुनियाची वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांना वाचकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. वाचकांच्या अपेक्षा आणि सूचनांनाही वेबदुनियाने अतिशय महत्त्व दिले असून त्यानुसार अनेक बदलही केले आहेत. नुकताच वेबदुनियाच्या मुखपृष्ठात झालेला बदल हे त्याचेच उदाहरण. याशिवाय नव्या पिढीच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन वेबदुनियाने करीयर, आयटी, लव्ह स्टेशन हे नवे विभाग सुरू केले आहेत. याशिवाय क्वेस्ट, मायवेबदुनिया यासह अनेक सेवाही सुरू केल्या आहेत. या सर्वांची प्रसिद्धी जनसामान्यांपर्यंत आणि विशेष करून विद्यार्थ्यांपर्यंत व्हावी यासाठीच वेबदुनियाने ही महत्त्वाकांक्षी प्रचार मोहिम आखली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर या सळसळत्या शहरापासून ही मोहिम सुरू होणार आहे. या शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन वेबदुनियाविषयीच्या माहितीचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले जाणार आहे. नागपूरनंतर महाराष्ट्रातील इतर शहरातही ही प्रसिद्धी मोहीम राबवली जाणार आहे. या निमित्ताने वेबदुनिया आणि वाचक यांच्यात सेतू बांधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी मराठीत पाय ठेवलेल्या वेबदुनियाने आता पाय रोवण्यापर्यंतची मजल मारली आहे. बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडींवरील लेख, धर्म, साहित्य, आरोग्य, क्रीडा, बॉलीवूड, भटकंती यासह अनेक विषयांना स्पर्श करणारे विभाग सुरू केले आहेत. याशिवाय अनेक सेवा मराठीत प्रथम देण्याचा बहुमानही पटकावला आहे. क्लासीफाईड, क्वेस्ट, ई-मेल या सेवा मराठीत देण्याबरोबरच जन्मकुंडली, पत्रिका जुळवणी या सेवाही सहजगत्या आणि अगदी मोफत आपल्या मातृभाषेत उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.