वेबदुनिया मंगळवारपासून औरंगाबादमध्ये
महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध अगदी आपल्याला हवा तसा घसरबसल्या देणार्या वेबदुनिया या मराठी पोर्टलच्या प्रसिद्धी मोहिमेचा दुसरा टप्पा औरंगाबादमध्ये मंगळवारपासून (ता२९) सुरू होत आहे. या अभियानास नागपुरातून १४ जुलैल सुरवात झाली आहे. नागपुरातील भरघोस प्रतिसाद पाठिशी घेऊन वेबदुनियाची टिम आता औरंगाबादमध्ये येत आहे. नागपूरमध्ये जवळपास 50 हून अधिक ठिकाणी वेबदुनियाची ही मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थी, पालकांसह नागपूरकरांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर दिलाच परंतु, मायमराठीत सर्व काही देऊ पहाणार्या वेबदुनियाचे कौतुकही केले. आता औरंगाबाद मधील विविध शाळा आणि महाविद्यालयांसह शहरातील प्रमुख भागात प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये सुरवातीच्या टप्प्यात कर्मवीर शंकर सिंह, शिवछत्रपती ज्युनिअर कॉलेज, कलावती चव्हाण स्कूल, गुजराती विद्यामंदिर, शिवछत्रपती स्कूल, गोदावरी स्कूल, बलराम पाटील स्कूल, मराठा हायस्कूल, संत ज्ञानेश्वर स्कूल, संत मीरा स्कूल, महाराष्ट्र हिंदी विद्यालय, वसंतदादा पाटील शाळा, मिलिंद कॉलेज, शिवाजी हायस्कूल, शिवाजी कन्या हायस्कूल, हॉलिक्रॉस हायस्कूल, वेणूताई चव्हाण हायस्कूल, दादा पाटील हायस्कूल. आदी शाळा आणि महाविद्यालयात प्रचार मोहीम राबवण्यात येणार आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी मराठीत पाय ठेवलेल्या वेबदुनियाने आता पाय रोवण्यापर्यंतची मजल मारली आहे. बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडींवरील लेख, धर्म, साहित्य, आरोग्य, क्रीडा, बॉलीवूड, भटकंती यासह अनेक विषयांना स्पर्श करणारे विभाग सुरू केले आहेत. याशिवाय अनेक सेवा मराठीत प्रथम देण्याचा बहुमानही पटकावला आहे. क्लासीफाईड, क्वेस्ट, ई-मेल या सेवा मराठीत देण्याबरोबरच जन्मकुंडली, पत्रिका जुळवणी या सेवाही सहजगत्या आणि अगदी मोफत आपल्या मातृभाषेत उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.