मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मागोवा 2011
Written By वेबदुनिया|

सेहवागचे द्विशतक, सचिनचा विक्रम मागे टाकला

विरेंद्र सेहवागने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला आहे. हा विश्वविक्रम करण्यासाठी त्याने १४० चेंडू घेतले. दोन्ही विक्रम भारतीय क्रिकेटपटूंच्या नावेच असून हे मध्यप्रदेशातच झाले आहेत, हे विशेष.

वेस्ट इंडिजविरूद्ध वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यात येथील होळकर क्रिकेट मैदानावर सेहवाग गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. तो अखेर २१९ धावांवर झेलबाद झाला. याअगोदर सचिन तेंडुलकरने ग्वॉल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध १४७ चेंडूत २०० धावा करून वनडेत द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला होता. सेहवागचे द्विशतक हे वनडे इतिहासातील दुसरे द्विशतक होय.