मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: रविवार, 19 ऑक्टोबर 2014 (11:54 IST)

सोनाली केबल : चित्रपट परीक्षण

सोनाली केबल या सिनेमात कॉर्पोरेटस् आणि राजकारण्यांच्या युतीमुळे सामान्य माणसांसाठी निर्माण होणार्‍या अडचणींना अप्रासंगिक पद्धतीने दाखवण्यात आले आहे. या सिनेमात मुंबईतील एका नेट प्रोव्हाइडर्सची मार्केट काबीज करतानाची लढाई दाखवण्यात आली आहे. मुंबईत राहणारी सोनाली (रिया चक्रवर्ती) काही तरुणांसोबत ब्रॉडबँड प्रोव्हाइडरच्या रुपात काम करते.

तिचा बालपणीचा मित्र (अली फजल) यूएसहून परत येतो आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवतो. व्यवसाय तेजीने वाढू लागतो, मात्र एक मोठा व्यावसायिक वाघेला (अनुपम खेर) त्यांच्या मार्गात अडचणी निर्माण करु लागतो. वाघेलाला ब्रॉडबँड इंटरनेट बिझनेसमध्ये 
आपली मोनोपोली हवी असते. तो सोनालीला आमिष देतो. मात्र सोनाली त्याच्या आमिषाला बळी पडत नाही. त्यानंतर आपापली जागा काबीज करण्यासाठी त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. पुढे काय होते, ते पडद्यावर पाहणे बरे..राघव जुयाल आणि रिया चक्रवर्ती यांनी आपली कामे उत्तम केली आहेत.