मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परदेशातील संधी
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (10:05 IST)

एज्युकेशन लोन कसे मिळवता येते, संपूर्ण माहिती

दर्जेदार उच्च शिक्षणासाठी अनेकदा शैक्षणिक कर्ज घ्यावं लागतो. शैक्षणिक कर्जासंबंधीचे विविध पैलू जाणून घ्या.
 
एज्युकेशन लोन म्हणजे
एज्युकेशन लोनचा अर्थ असा होतो की माध्यमिक वर्गानंतर किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी केलेल्या खर्चासाठी वित्त व्यवस्था केली जाऊ शकते. शैक्षणिक कर्ज एकतर सरकारकडून घेतले जाऊ शकते किंवा ते खाजगी क्षेत्रातील कर्ज स्त्रोताकडून घेतले जाऊ शकते.
 
एज्युकेशन लोनचा ईएमआय कसा ठरवला जातो
इक्वेटेड मंथली इंस्टॉलमेंट्स (ईएमआई) लोन फेडण्याचा साधन असून हे लोनच्या प्रिंसिपल अमाउंट आणि लोनचा व्याजाला हळूहळू मासिक आधारावर पैसे चुकवण्याचं काम करतं. प्रत्येक ईएमआयमध्ये प्रिंसिपल लोन अमाउंट आणि फेडण्यात येणारं व्याजाचं कंपोनेंट असतं. कर्जाच्या एकूण कालावधीचा विचार केल्याशिवाय कर्ज घेण्याचा कोणताही निर्णय घेता येत नाही. जोपर्यंत शिक्षण कर्जाचा संबंध आहे, त्याची मर्यादा बँक ते बँक बदलू शकते. शिक्षण कर्जाची परतफेड सहसा विद्यार्थी कोर्स पूर्ण केल्यानंतर सुरू होते. या कालावधीसाठी प्रत्येक बँकेची वेगवेगळी मानके असतात, त्या आधारावर ते ठरवतात की विद्यार्थ्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी किती वेळ द्यावा.
 
एज्युकेशन लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचे काय फायदे आहेत
एज्युकेशन लोन ईएमआय कॅल्क्युलेटरने भारतात किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज घ्यायचे आहे ती रक्कम तुमच्या बजेटमध्ये येत आहे की नाही हे तुम्हाला कळते. एज्युकेशन लोन ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे आपण जलद आणि सोप्यारीत्या हे जाणून घेऊ शकता की आपल्या लोनची इंस्टॉलमेंट किती येईल जी आपल्याला रेगुलर इंटरवलवर फेडावली लागेल. कर्जाच्या एकूण रकमेची तसेच व्याज रकमेची गणना करून, हे आपल्याला सांगते की एकूण किती खर्च होईल.
 
ईएमआय कॅल्क्युलेशन तुम्हाला कशी मदत करते
ईएमआय कॅल्क्युलेशनद्वारे कर्जाच्या ईएमआयसाठी तुम्हाला दरमहा किती पैसे वेगळे ठेवावे लागतील हे तुम्हाला स्पष्टपणे कळेल, ज्याने आपण योग्य निर्णय घेऊ शकता की एज्युकेशन लोन आपल्या बझेटमध्ये आहे वा नाही. तुम्हाला दरमहा EMI म्हणून किती पैसे खर्च करावे लागतील, जर तुम्हाला हे माहीत असेल तर तुमच्या घरगुती खर्चाचे नियोजन करण्यात तुम्हाला खूप मदत होते.
 
ईएमआय तपासण्याचे फायदे काय आहेत
कर्ज घेण्याची क्षमता तपासू शकतो
कर्जाची एकूण रक्कम आणि कालावधी तपासाता येते
कर्जाची परतफेड करण्याची योजना करू शकतो
प्रीपेमेंटची योजना करू शकतो
 
एज्युकेशन लोन घेण्याचे फायदे जाणून घ्या 
याद्वारे, आपण ट्यूशन फीस, हॉस्टल फीस आणि पुस्तके इत्यादींचा खर्च उचलू शकता.
बँका सहसा शिक्षणाच्या खर्चाच्या 90 % पर्यंत निधी देतात.
तुम्हाला त्याच्या व्याजावर आयकर कपातीचा लाभ मिळतो.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच परतफेड करावी लागते.
शिक्षण कर्जाद्वारे, विद्यार्थ्याला ही सुविधा मिळते की कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याला कोणता पर्याय घ्यायचा आहे हे तो चांगले ठरवू शकतो, ज्याद्वारे तो कर्जाची परतफेड करू शकतो आणि खर्च देखील चालवू शकतो.
वेळेवर कर्जाची परतफेड केल्याने चांगला क्रेडिट स्कोअर होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज घेणे सोपे होते.
 
लोन संमत होण्यासाठी लागणारी कागदपत्रे
विद्यापीठ तसेच महाविद्यालयाचे प्रवेश निश्चित झाल्याचे पत्र
संपूर्ण शैक्षणिक खर्चाचा तपशील 
दरवर्षी शैक्षणिक शुल्क किती याची माहिती
इतर खर्च असल्यास त्याचा तपशील
व्हिसा व प्रवासासंबंधीची कागदपत्रे
स्टडी परमिट
पूर्वीचा वर्षांचा शैक्षणिक रेकॉर्ड
पालकांची आयकरसंबंधी कागदपत्रे
पालकांद्वारे अगोदरची तीन वर्षे फाईल केलेले रिटर्न्स
हमीदाराच्या आयकरासंबंधीचे व उत्पन्नासंबंधीचे पुरावे