मैत्री ही मैत्री असावी
पाण्यासारखी निखळ असावी,
हवेसारखी शुध्द असावी
नित्य सुगंधित फुलासारखी मैत्री असावी
काट्यासारखी नसावी कुरूप
मनात स्वार्थी भावना नसावी,
गरजेपुरती नसावी मैत्री
कायमची ती असावी सोबती
सुख -दु:खात सोबत असणारी
अशीही मैत्री असावी
जिवाला जीव देणारी
मैत्रीकरता त्याग करणारी
मैत्रीचे पावित्र्य राखणारी
मैत्री ही मैत्री असावी
जगण्याचा एक किरण असावी
आशेचा एक किरण असावी
जीवनाची एक दिशा असावी
हि-यापेक्षा मौल्यवान असावी
अशी तुझी माझी मैत्री असावी.