गजानन महाराज मंत्र गण गण गणात बोते याचा अर्थ काय
श्री गजानन महाराज यांचे भव्य समाधी मंदिर शेगाव येथे आहेत.
गण गण गणात बोतेहा मंत्र शेगावचे संत गजानन महाराज म्हणत असत. तर काही गणी गण गणांत बोते असे ही जप करतात.
भजन मंत्राचा अर्थ या प्रकारे आहे- गणी म्हणजे विचार करणे किंवा लक्षात घेणे. गण म्हणजे जीवात्मा. गणांत म्हणजे बह्माहून वेगळा नसलेला. अर्थात जीव हाच ब्रह्म आहे. बोते म्हणजे जयजयकार करा.
याचा अर्थ जीवात्मा ब्रह्माहून वेगळा नसून त्याचे चिंतन करा.
अर्थात गण गण गणात बोते, याचा अर्थ जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.