Ganesh Chaturthi 2025 गणपतीला लंबोदर का म्हणतात?
ज्योतिषशास्त्रात देव, मनुष्य आणि राक्षस या तीन गणांचा उल्लेख आहे. तसेच गणपती देवलोक, भूलोक आणि दानव लोकात समान आदरणीय आहे. श्री गणेशजी ब्रह्मस्वरूप असून हे तिन्ही लोक त्यांच्या पोटात आहे. म्हणूनच त्यांना लंबोदर म्हणतात.
त्यांच्या पोटात सर्व काही सामावलेले आहे आणि गणेशजींमध्ये सर्वकाही पचवण्याची क्षमता आहे. लंबोदर असण्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पोटात जे काही जाते ते तिथून बाहेर पडत नाही. गणेशजी अत्यंत रहस्यमय आहे, त्यांचे रहस्य कोणीही उलगडू शकत नाही.
Edited By- Dhanashri Naik