Chocolate Modak: मुलांकडून तयार करवून घ्या बाप्पासाठी नैवेद्य
साहित्य:
अर्धा वाटी खवा, अर्धा वाटी पिठी साखर, 2 चमचे कोको पावडर
कृती:
खवा भाजून घ्यावा. त्यात पिठी साखर मिसळून घ्या. कोको पावडर घालून मिश्रण घट्टसर होयपर्यंत हालवावे. मिश्रण घट्ट झाले की जरा गार करावे की मोदकाच्या साच्यात घालून मोदक तयार करावे.
विशेष टिप्स- आपण कोको पावडरऐवजी मिल्क वितळेली चॉकलेट देखील वापरू शकता. तसेच मिश्रण घट्ट करण्यासाठी मिल्क पावडर देखील घालू शकता. आपण आवडीप्रमाणे यात सुके मेवे देखील मिसळू शकता.