बाप्पासाठी स्वादिष्ट मायक्रोवेव्ह ‘मावा मोदक’
साहित्य:
1 कप खवा
1 कप साखर
4 ते 5 टेस्पून मिल्क पावडर
3 चिमटी वेलची पूड
कृती:
साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवा. त्यानंतर खवा मायक्रोवेव्हसेफ भांड्यात ठेवून 2 मिनिट हाय पॉवरवर गरम करा. भांडे बाहेर काढून 1 ते 2 मिनिट ढवळा. यामुळे आत कोंडली गेलेली वाफ बाहेर पडेल. परत ४५ ते ५० सेकंद मायक्रोवेव्ह करा. त्यानंतर भांडे बाहेर काढून ढवळा. खवा कोमटसर झाला कि पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून मिक्स करुन घ्या. मिश्रण व्यवस्थित आळले तर मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवावेत. मिश्रणाला जर मोदक होण्याइतपत घट्टपणा आला नसेल तर मिल्क पावडर घालून मिश्रण हाताने मळून घ्यावे.