रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (15:32 IST)

नाना परिमळ : गणपतीची आरती

।। नाना परिमळ ।। 
नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमीपत्रें ।। लाडू मोदक अन्न परिपूरित पात्रें ।। धृ ।। 
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।। अष्टहिसिध्दि नवनिधि देसी क्षणमात्रें ।। १ ।। 
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।। तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।।  
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।। त्यांची सकलहि पापे विघ्नहि हरती ।। 
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।। सर्वहि पावुनी अंतप भवसार तरती ।। २ ।। 
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणप ।। कीर्ति तयांची राही जोंवरि शशितरणी।। 
त्रैलोक्यप ते विजयी अद्भुत ते करणी । गोसवीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।