Last Updated :मुंबई , सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (17:39 IST)
सेलिब्रिटी गणेशा!
देशभर सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू असून बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरीही लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी रविवारी सहकुटुंब मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
अभिनेत्री अमिषा पटेल, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, सोनाली बेंद्रे व हृतिक रोशनने आपल्या घरी बसविलेल्या दीड दिवसाच्या गणरायाला पारंपरिक पद्धतीने निरोप दिला. अभिनेत्री राणी मुखर्जीनेही लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेतले.