शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (14:20 IST)

Ganesh Mantra: गणपतीचे हे 3 मंत्र दूर करतील जीवनातील संकट

Ganesh Gayatri Mantra
गणपतीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दु:ख आणि संकट नाहीसे होतात. कोणत्याही संकटातून निघण्यासाठी गौरीपुत्र गणेशाची पूजा केली जाते. गणपतीची सात्त्विक साधना अत्यंत सोपी आणि प्रभावशाली असल्याचे सांगितले जाते. आज आम्ही असे 3 मंत्र सांगत आहोत ज्यांचे जप केल्याने जीवनात सुख-समृद्धी नांदते.
 
गणेश गायत्री मंत्र:
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।।
 
हे गणेश गायत्री मंत्र आहे. मनोभावे या मंत्राचा जप दररोज 108 वेळा करावा. याने गणपती प्रसन्न होतात. सतत 11 दिवस गणेश गायत्री मंत्र जपल्याने व्यक्तीचे पूर्व कर्मांचे वाईट फल नाहीसे होतात.
 
तांत्रिक गणेश मंत्र:
ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश।
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति। मेरे कर दूर क्लेश।।
 
दररोज सकाळी महादेव, पार्वती आणि गणपतीची पूजा केल्यानंतर या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याने सर्व दु:ख नाहीसे होतात. परंतू या मंत्राचा जप करताना पूर्ण सात्त्विकता राखावी. सोबतच क्रोध, मांस, मदिरा, परस्त्री यापासून दूर राहावे.
 
गणेश कुबेर मंत्र:
ॐ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा।
 
एखाद्याला खूप कर्ज झाले असल्यास किंवा आर्थिक समस्या वाढल्या असल्यास या मंत्राचे जप करावे. हे मंत्र नियमित जपल्याने ऋण फेडलं जातं. धन आगमनाचे नवीन स्रोत देखील तयार होतात.