शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (20:00 IST)

पावन व्रत असें व्रत हरितालिकेचे

Haritalika Tritiya Special
पावन व्रत असें व्रत हरितालिकेचे,
पार्वतीने जे केलें, श्री शंकरा साठी जे,
मिळेल सौभाग्य अन नांदा सौख्यभरे,
फळच या व्रताचे, हेच आहे खरे,
सख्या सोबतीने आळवू महादेवा स,
काढून पिंड वाळूची, भक्तिभावे पुजू त्यास,
खेळून खेळ साऱ्या जणी फेर धरू,
पिढ्यानपिढ्या हेंच आहे आजही सुरू,
अशीच जपावी परंपरा अन करा सण,
हेंच तर प्रत्येक सणांच आहे सांगणं !
...अश्विनी थत्ते