सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

हरतालिका तृतीया, शुभ मुहूर्त, पूजा विधी, महत्त्व

हरतालिका व्रत सुवासिनी आपल्या नवर्‍याच्या दिघार्युष्यासाठी करतात आणि या दिवशी महादेव-पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया निर्जला व्रत करतात. शृंगार करून व्रत, पूजा, आरती आणि कहाणी करतात. अनेक स्त्रिया रात्री चंद्राला अर्घ्य देखील देतात.
 
महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत हरतालिका तृतीय या नावाने प्रसिद्ध आहे तर दक्षिण भारतीय भागात याला गौरी हब्बा असे म्हणतात. हे व्रत विवाहित आणि अविवाहित स्त्रिया देखील करू शकतात. विवाहित स्त्रिया आपल्या साथीदाराच्या दिर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली योग्य आणि मनोइच्छित वर मिळाला या इच्छेने हे व्रत करतात.
 
या वर्षी हरतालिका तृतीया 1 सप्टेंबर, रविवारी रोजी आहे.
 
शुभ मुहूर्त
सकाळी 5.27 ते 7.52 पर्यंत
प्रदोष काल मुहूर्त संध्याकाळी 17.50 ते 20.09 पर्यंत
 
हे व्रत पहिल्यांदा देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केले होते. पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी अन्न, पाणी सर्व त्याग केले होते. त्यांचे वडील त्यांचा विवाह प्रभू विष्णूसोबत लावू इच्छित होते परंतू मनात महादेवाला पती मानून चुकल्या देवी पार्वतीने आपल्या सखीसोबत अरण्यात जाऊन वाळूच्या शिवलिंग स्थापित करून कठोर तप आणि व्रत केले. या दरम्यान देवींनी काहीही ग्रहण केले नाही. पार्वतीची कठोर तपस्या बघून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी देवींना पत्नी रूपात स्वीकार केले.
 
या मुळे अनेक स्त्रिया हे व्रत निर्जल करतात. रात्री जागरण करून व्रत पूर्ण करतात.
 
या दिवशी वाळूने महादेवाची पिंडी, पार्वती आणि सखीची प्रतिमा तयार केली जाते.
हरतालिका पूजा करण्यापूर्वी गणपतीचे आव्हान केले जातात. विड्यांच्या पानावर खारीक, बदाम, शिक्का ठेवून सुपारीच्या रूपात गणपतीची स्थापना करून त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते.
गणपतीला अभिषेक करून, जानवं, शेंदूर, लाल फुलं, दूर्वा, नैवेद्य अर्पित केलं जातं.
नंतर वाळू निर्मित प्रतिमेवर महादेवाला स्नान करवून त्यांना बेलपत्र, शमीपत्र आणि फुलं अर्पित केलं जातात.
या दिवशी महादेवाला विविध पत्री अर्पित करण्याचे अत्यंत महत्त्व आहे.
महादेवांची विधीपूर्वक पूजन केल्यानंतर देवी पार्वती आणि सखीची पूजा केली जाते. त्यांना शृंगारांच्या वस्तू अर्पित केल्या जातात.
नंतर नैवेद्य दाखवून आरती आणि कहाणी केली जाते.
कहाणी हरतालिकेची
या दिवशी रात्री देखील आरती करून जागरण करतात.
दुसर्‍या दिवशी दही-कान्हवलेचे नैवेद्य दाखवून व्रताचे समापन केलं जातं.