रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (16:48 IST)

Jyeshtha Gauri Pujan wishes 2024: ज्येष्ठागौरी पूजन शुभेच्छा

* सोन्यामोत्यांच्या पावली
आली अंगणी गौराई
पंचपक्वान, झिम्मा-फुगडी,
पूजा-आरतीची घाई
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया
घरा दारा लाभो सदा कृपेची छाया
ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* आली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख समृद्धी,
ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* गौराई माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवधी धरती,
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी
ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी
संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल
आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
* पहाटे पहाटे मला जाग आली
चिमण्यांची किलबिल माझ्या कानावर पडली
हळूच एक चिमणी कानात सांगू गेली
ऊठाऊठा सकाळ झाली
जेष्ठ गोरी याच्या आगमनाची वेळ झाली
ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* गवर गौरी ग गौरी ग,
झिम्मा फुगडी खेळू दे,
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे
ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* भाद्रपदामध्ये पसरली हिरवळ
सुंदर दिसे निसर्गाची किमया
गौराईच खेळायची आहे ना
मग आँनलाईन जमुयात सर्व सख्या!
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* सरींचा वर्षाव सणांचा उत्सव
संस्कृती जपायला भाद्रपद आला
व्रत वैकल्यांचा सण हा आला
झिम्मा फुगडी पारंब्याचे झोके घेत
परंपरेचा सुहास दरवळुनी गेला!
ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा भाद्रपद
सौभाग्यवती पुजती गौरीगणपती
खेळ खेळुनी पारंपरिक थोर!
ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला
पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला
घालुनी फुगड्या सयांनो
हिला मनोरंजीत करा
लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा
ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* पंच पक्वान्नाचा भोज करू,
सोळा भाज्यांचा नैवेद्य
करुन पूजा आणिआरती,
शेवटी पानांचा विडा करी देऊ
आई भुलचुक मजशी माफ करो,
सुख समृध्दीचे दान पदरी घालो
ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
ज्येष्ठागौरी पूजनाच्या शुभेच्छा!
 
* सर्व मंगल मांगल्ये शिवे
सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोस्तुते।।
ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली
रात जागवली पोरी पिंगा!
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवा सह गौरीची
जय जय गौराई..
तिच्या मनी असे एक आशा
होऊ नये तिची निराशा
होवो सर्व इच्छांची पूर्ती
समृद्धी घेऊन आली गौराई!
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता
आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,
निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,
मुबलक धनधान्य तसेच व
विद्याभ्यासात सुयश घेऊन ये
आणि तिची कृपा दृष्टी निरंतर
आपणां सर्वांवर राहो…
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* आली आली गं गौराई,
माय माझी माहेराला
चला चला गं सयांनो,
ताट घेऊ पुजनाला
तिचं शिण काढूया गं,
तिला जेवू घालूया
तिला भरजरी पैठणीचं,
पदर देऊया
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
 

Edited by - Priya Dixit