गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (13:37 IST)

घरी तयार करा इको फ्रेंडली गणपती, जाणून घ्या सोपी विधी

इको फ्रेंडली गणपती आपण बाजारातून ऑर्डरने बनवून घेत असाल पण यावर्षी आपण स्वत: च्या हाताने गणपती बनवले तर किती मजा येईल न! हे खूप सोपे आहे, चला बघू या कसे तयार करता येतील मातीचे इको फ्रेंडली गणपती...
 

हे गणपती बनविण्यासाठी आपल्याला लागणारी आवश्यक सामुग्री: 
सामुग्री- 1 किलो पेपरमेशी माती (ही माती स्टेशनरी दुकानात मिळेल), पाणी, फिनिशिंगसाठी ब्रश, चाकू, बोर्ड आणि पॉलिथिन.
विधी- 1. सर्वात आधी एका फ्लॅट स्थानावर बोर्ड ठेवा आणि त्यावर टेपच्या मदतीने पॉलिथिन चिटकवून द्या.
 
2. आता पेपरमेशी माती घेऊन मळा. माती हाताला चिकटू नये तो पर्यंत मळत राहा. आपल्याकडे पावडर माती असल्यास गोंद किंवा फेविकॉलच्या मदतीने माती मळून घ्या. आता ही 3 समान भागात वाटून घ्या.
3. यातून एक भागाचा गोळा तयार करून त्याचे दोन भाग करा.
 
4. या दोन भागातून एकाचा बेस तयार करायचा आहे, ज्यावर गणपती विराजित होतील. बेस तयार करण्यासाठी मातीला लाडूचा आकार देऊन हलक्या हाताने दाबून फ्लॅट करून घ्या. याची जाडी अंदाजे 0.5 मि.मी आणि पूर्ण गोळ्याची रुंदी अंदाजे 10 ते 12 सें.मी. असली पाहिजे.
5. आता दुसरा भाग घेऊन त्याला ओव्हल शेप द्या. याने पोट तयार होईल.

6. हे तर पहिल्या भागाचे काम झाले. आता दुसरा मोठा गोळा घेऊन त्याचे 4 भाग करा. यातून हात आणि पाय तयार होतील. हात- पाय तयार करण्यासाठी चारी मातीच्या गोळ्यांना पाइपचा आकार दयाचा आहे. नंतर या चारी पाइपला एका बाजूने पातळ करायचे आहे. हे अंदाजे 7 ते 8 सेमी असतील.
 
7. हे चारी पाइप्सला मधून मोडून यांना V असा शेप द्या. आता गणपतीचे पोट, दोन्ही हात आणि दोन्ही पाय तयार झालेले आहे. हे सर्व भाग बेसवर जमवून घ्या-
8. सर्वात आधी बेस बोर्डच्या मधोमध ठेवा.
 
9. यावर पायाच्या आकृतीला आलथी-पालथी अश्या मुद्रेत जमवून घ्या.
 
10. पायांच्या वरती ओव्हल गोळा मागल्या बाजूने अर्थात पायाला चिकटवून घ्या.
11. आता चाकू किंवा इतर साधनाच्या मदतीने पोटामधील माती फ्लॅट करून आपसात चिकटवा.
12. आता मूर्तीला दोन्ही हात लावण्यासाठी त्यातून जाड असलेल्या बाजूने दोन लहान गोळे काढून खांदे म्हणून पोटाच्या सर्वात वरील बाजूला चिकटवा.
 
13. आता हात खांद्याला जोडून द्या. हातांची लांबी मूर्तीच्या आकाराप्रमाणे असावी.
14. गणपतीचा उजवा हात जरा मोडून आशीर्वाद या मुद्रेत बनवा आणि दुसरा हात प्रसाद असलेल्या मुद्रेत तयार करा. यात लहानसा मोदक बनवून ठेवा.

15. आता तिसरा मोठा भाग घ्या. याचे चार एकसारखे भाग करा.
 
16. यातून एक भाग घ्या. यातील जराशी माती घेऊन मान तयार करा आणि उरलेल्या गोळ्यातून डोकं. आता पोटावर मान आणि त्यावर डोकं अश्या प्रकारे जोडून द्या.
17. आता दुसरा गोळा घेऊन सोंडेचा आकार देत डोक्याला जोडून द्या.
18. तिसरा भाग घेऊन याचे दोन गोळे करा. त्यातून एक गोळा पोळीप्रमाणे फ्लॅट करून त्याला मधून कापून घ्या. हे तयार झाले गणपतीचे कान.
 
19. हे कान जोडून घ्या.
20. आता दुसर्‍या भागाचा कोण तयार करा आणि मुकुट म्हणून जोडून द्या. आपल्या हवं असल्या पगडीची तयार करू शकता.
21. आता चौथा गोळा घेऊन त्यातून जरा माती काढून गणपतीचे दात बनवा. गणपतीच्या उजव्या बाजूकडील दात पूर्ण व डाव्या बाजूकडील दात लहान असावा.
22. आत उरलेल्या मातीतून लहानसा उंदीर तयार करा. मूषक तयार करण्यासाठी मातीचे तीन भाग करा. एक भाग ओव्हल अर्थात पोट बनवा. दुसर्‍या भागाचे तीन भाग करा, ज्यातून डोकं, कान आणि शेपूट तयार होईल. तीसर्‍या भागाचे चार भाग करा ज्यातून हात आणि पाय तयार होतील. हवं असल्यास मूषकच्या हातात लहानसा लाडूही ठेवू शकता.
 
आता आपला इको फ्रेंडली गणपती तयार आहे. हा तयार केल्यानंतर मूर्तीला तीन ते चार दिवस सावलीत वाळू द्या. नंतर त्यावर आपल्या आवडीप्रमाणे इको फ्रेंडली कलर करा किंवा सजवा.