1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
  4. which ganesha idol is good for ganesh chaturthi

'श्रीं'ची मूर्ती कशी असावी? गणेश चतुर्थीला गणपतीची कोणत्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी

ganesha idol
1. माती किंवा वाळूची मूर्ती: माती किंवा वाळूने तयार गणेशाची मूर्ती विराजित केली पाहिजे, कारण माता पार्वतीने गणेशाची मूर्ती त्यापासून बनविली आहे.
 
2. उंदीर : गणपतीची मूर्ती आणताना सोबत मूषक असणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
 
3. एकदंत: गणेशाची अशी मूर्ती एकदंत असावी ज्याचा एक दात तुटलेला असेल.
 
4. चारभुज : गणेश मूर्तीला चार हात असावेत. चारही हातात अनुक्रमे पाश, अंकुश, मोदक आणि वरमुद्रा या प्रकारे असावे.
 
5. वस्त्र: गणेश रक्तवर्ण, लम्बोदर, शूर्पकर्ण आणि पीतवस्त्रधारी आहे. लाल किंवा पिवळे कपडे शुभ असतात.
 
6. डावी सोंड: डावीकडे सोंड वळलेली मूर्ती बसवण्याची प्रथा आहे.
 
7. जानवे : मूर्तीला जानवे घातलेले असतील तर योग्यच नसेल तर पूजेच्या वेळी मूर्तीला जानवे घालावे.
 
8. विराजित मूर्ती : घरामध्ये पाटावर किंवा सिंहासनावर बसलेली गणेशाची मूर्ती आणावी.
 
9. मूर्तीचा रंग : मूर्तीचा रंग पांढरा, सोनेरी, शेंदुरी किंवा हिरवा शुभ असतो.
 
10. झाकलेले डोके : परंपरेनुसार गणेशाचे डोके मुकुट, टोपी किंवा पगडी इत्यादींनी झाकलेले असावे.
 
11. त्रिपुंड टिळक : गणेशाच्या कपाळावर केशर किंवा चंदनाचा त्रिपुंड तिलक असावे.
पुढील लेख
श्री शंकराची आरती