शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

कळंबचा श्री चिंतामणी

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे श्री चिंतामणीचे भव्य मंदिर आहे. 'कदंबपूर' या नावाने ही संपूर्ण विदर्भात श्री चिंतामणी क्षेत्र ओळखले जाते.

गणेशपुराण आणि मुद्‌गल पुराणात येथील श्री चिंतामणीचे वर्णन आलेले आहे. अष्टविनायकांपैकी थेऊर येथील चिंतामणी गणेशाची जी कथा वर्णिली आहे; तीच याही गणेशाची आहे. चिंतामणी स्थापना इंद्राने केली असल्याचा उल्लेख पुराणात आहे. मंदिर खूप खोलगट भागात आहे. मंदिराच्या दर्शनी भागात उजव्या हाताला चौमुखी गणेशाची मूर्ती आहे. एकाच पाषाणातून ही मूर्ती कोरलेली आहे. मंद‍िरात पावनकुंड आहे.