शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 22 मे 2014 (14:17 IST)

मुख्यमंत्री चव्हाण यांचे केंद्र, पक्षश्रेष्ठींवर खापर

काँग्रेसविरुध्द लोकांच्या मनात प्रचंड राग होता. दिल्लीतील आमच्या तिन्ही नेत्यानी (सोनिाया, राहुल गांधी व मनमोहनसिंग) जनतेशी अपेक्षित संवाद साधला नाही, अशा शब्दात पराभवाचे खापर काँग्रेसश्रेष्ठी आणि केंद्राच्या कामगिरीवर फोडून मुख्यमंत्रीत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी हात झटकले.

राज्यात विधानसभेची एक पोटनिवडणूक आम्ही जिंकली. राज्य सरकारविरुध्द लाट असती तर आम्ही जिंकलो असतो काय, अशी मखलाशीही त्यांनी केली. रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक विजयी झाले आहेत. मुस्लीम मतदार काँग्रेसच पाठीशी उभा राहिल्याने विशिष्ट वर्ग आमच्याविरुध्द गेला काय? याचे परीक्षणही करणे गरजेचे आहे, असे चव्हाण म्हणाले. मोदींच्या सभांचे नियोजन व्यवसायिक पध्दतीने होते. आम्ही त्यात कमी पडलो, अशी कबुलीही त्यांनी दिली.