testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ट्रेण्ड रेडिमेड गुढीचा

गुढी म्हणजे आनंद, विजय आणि स्वागताचे प्रतीक. उंच बांबूपासून गुढी तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंबाचा, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे (तांब्या) बसवला जातो. नंतर गुढी पाटावर उभी केली जाते. मात्र आताच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळही मिळणे कठीण झाले आहे. याला पर्याय म्हणूनच रेडिमेड गुढीचा नवा ट्रेण्ड निर्माण झाला.
> आता गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई, ठाणे येथील बाजारपेठांमध्ये विविध आकाराच्या आकर्षक गुढय़ा ग्राहकांना भुरळ पाडत आहेत. साधारण ६५ ते २३0 रुपयांपर्यंत विविध आकाराच्या गुढय़ा बाजारात उपलब्ध आहेत. यंदा ५ ते १0 रुपयांनी गुढय़ांच्या किमतीत वाढ झाली असल्याचे दुकानदार प्रतीक विध्वंस यांनी सांगितले. तर गेल्या चार-पाच वर्षांपासून रेडिमेड गुढीचा ट्रेण्ड बाजारात आला असून अलीकडे या छोट्या गुढय़ांना ग्राहकांची जास्त मागणी असल्याचेही ते म्हणाले. पाट आणि त्यावर असलेले नक्षीदार कापड, नारळ, तांब्या, आंब्याची पानं, गुढीभोवती असलेले कापड, हार इत्यादी सर्व साहित्याचा समावेश रेडिमेड गुढीमध्येही पाहावयास मिळतो. त्यामुळे या सगळ्या साहित्याची जमवाजमव करण्यापेक्षा या रेडिमेड गुढय़ा घेण्याकडेच लोकांचा अधिक कल वाढल्याचे दिसून येते. सुंदर नक्षीकाम, चमकदार कापड व आकर्षक सजावटीमुळे या मनमोहक रेडिमेड गुढय़ा खरेदी करण्याचा मोह नागरिकांना होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे.
> मयुरी चव्हाण


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

धनत्रयोदशीची कहाणी

धनत्रयोदशीची कहाणी
एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी ...

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या
पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे म्हणून या दिवशी शनी व्रत आणि पूजन केलं जातं.

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?
पुष्य नट्रक्षात लोक बर्‍याचदा सोनं किंवा चांदी विकत घेतात, पण लोखंड खरेदी करायचा की नाही ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय खरेदी करावी
ज्योतिष्यांप्रमाणे यंदा पुष्‍य नक्षत्र दोन दिवस असेल. 21 ऑक्टोबर रोजी सोम पुष्य आणि 22 ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा वाचून घ्या
काचेचं तुटलेलं सामान घरातील कोणत्याही कोपर्‍यात तुटलेलं काचेचं सामान किंवा खिडकीत तुटका ...

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...