साहित्य : 4 मोठे चमचे चणा डाळ, 2-2 चमचे तुरीची, मुगाची व मसुरीची डाळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 कांदे, 2 चमचे आल- हिरवी मिरची पेस्ट, मीठ, तिखट, धणे, जिरे चवीनुसार.
कृती : चण्याचा डाळीला किमान 10 तास भिजत ठेवावे व इतर डाळींना 4-5 तास भिजत ठेवले तरी चालेल. आता डाळींच्या मिश्रणाला मिक्सरमधून जाडसर काढून घ्यावे. मसाले, कोथिंबीर घालून मिश्रण तयार करावे. नंतर तव्यावर तेल घालून सोनेरी होईपर्यंत शेकून घ्यावे. मिक्स डाळींचे धिरडे तयार आहे.