मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (07:43 IST)

Hanuman Jayanti Wishes In Marathi हनुमान जयंती शुभेच्छा संदेश

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती, 
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, 
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, 
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
 
रामाचा भक्त तू, 
वाऱ्याचा पुत्र तू, 
शत्रूची करतोस दाणादाण 
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम... 
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम... 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
 
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान...
एक मुखाने बोला... जय जय हनुमान...
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी, 
करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी... 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
 
पवनतनय संकट हरन, 
मंगल मूर्त रूप राम लखन, 
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप... 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
 
ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे, 
काळाग्नी काळरूद्राग्नी देखता कापती भये... 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
 
मनोजवं मारूततुल्य वेगं जितेद्रिंयं बुद्धिमतां वरिष्ठम् ... 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
 
महारूद्र अवतार हा सुर्यवंशी, 
अनादिनाथ पूर्ण तारावयासी, 
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला, 
नमस्कार माझा तया मारूती रायाला.. 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
 
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे, 
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
 
भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी, 
गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान, 
तरून जो जाईल सिंधु महान 
असा एकच श्री हनुमान... 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा