प्रदक्षिणेनंतर काय करावे?
देवतेला शरणागत भावाने नमस्कार व प्रार्थना करावी.
उजव्या हातात तीर्थ घेऊन ते प्राशन केल्यावर त्याच हाताचे मधले बोट व अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत व कपाळावरून डोक्यावर वरच्या दिशेने फिरवावीत.
प्रसाद घेण्यासाठी नम्रतेने थोडे वाकावे.
देवळात बसून प्रथम थोडा वेळ नामजप करावा व मग प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा.
निघताना देवतेला पुन्हा प्रार्थना करावी. देवळाबाहेर पडल्यावर आवारातून कळसाला नमस्कार करावा.