रविवार, 28 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

लग्नाचा शेवटचा मुहूर्त 13 जुलैला

लग्नासाठी या सीझनमध्ये आता 13 जुलैचे एकच मुहूर्त बाकी आहे. याच्या आधी किंवा नंतर लग्नासाठी एकही मुहूर्त निघत नाही आहे. यानंतर लग्नासाठी लोकांना 11 नोव्हेंबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे. पुढील महिन्यात चातुर्मास लागेल. चार महिन्यापर्यंत शुभ कार्य वर्जित राहतील. या काळात लोक फक्त देवाचे भजन-कीर्तनात रमतील.
 
पुढील महिन्यात जुलैच्या 13 तारखेला आषाढ नवमी तिथी येईल. याला लग्नासाठी अक्षय तृतीयेबरोबर मुहूर्त मानले जाते. या दिवशी एक लग्न करू शकता. यंदा मे च्या सुरुवातीत मुहूर्त नसल्यामुळे लग्नाचे आयोजन बंद झाले आहे. उज्जैनचे पंचांगकर्ता एवं ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांनी म्हटले आहे की 3 मे रोजी शुक्र तारा अस्त असल्यामुळे मुहूर्त निघत नाही आहे. 10 जुलैपर्यंत शुक्र तारा अस्त राहील. पण त्यानंतर शुक्र उदय झाल्याने देखील काही होणार नाही, कारण पाच दिवसानंतरच 15 जुलैला देवशयनी एकादशीपासून देव झोपी जातील आणि चातुर्मास लागेल. 
 
पाच महिन्यात लग्नाचे मुहूर्त
नोव्हेंबर - 16, 23, 24
डिसेंबर - 1, 3, 8, 9, 12 
जानेवारी - 16, 17, 18, 22, 23 
फेब्रुवारी - 5, 6, 18, 19, 23, 28 
मार्च- 4, 13