शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

काय असतं पाप-पुण्य, आपल्याकडून चुकीचं घडत तर नाहीये

हिंदू धर्मग्रंथ वेद याचे संक्षिप्त आहे उपनिषद आणि उपनिषद याचे संक्षिप्त आहे गीता. स्मृतियां तिन्हीची व्यवस्था आणि ज्ञान संबंधी गोष्टी क्रमश: आणि स्पष्ट रुपात दर्शवते. पुराण, रामायण आणि महाभारत हिंदू प्राचीन इतिहास आहे धर्मग्रंथ नाही.
 
विद्वान म्हणतात की धर्मग्रंथानुसार जीवन व्यतीत केले पाहिजे. येथे प्रसतुत आहे धर्मानुसार प्रमुख दहा पुण्य आणि दहा पाप. हे पाप आणि पुण्य जाणून घेतल्यावर आणि यावर अमल केल्याने कोणातही व्यक्ती जीवनात क्रांतिकारी परिवर्तन घडवू शकतो.
 
दहा पुण्य कर्म-
1.धृति- प्रत्येक परिस्थितीत धैर्य ठेवावे.
2.क्षमा- सूड उगवण्याची भावना नसावी, क्रोधाचे कारण असले तरी क्रोध न करणे.
3.दम- उदंड नसावे.
4.अस्तेय- दुसर्‍यांची वस्तू हिसकावण्याचा विचार न करणे.
5.शौच- आहाराची शुद्धता, शरीराची शुद्धता.
6.इंद्रियनिग्रह- इंद्रिये विषयात अर्थात कामनांमध्ये लिप्त नसाव्या.
7.धी- कोणत्याही गोष्टीला प्रमाणिकपणे समजणे.
8.विद्या- धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचे ज्ञान.
9.सत्य- खोटं आणि अहितकारी वचन न बोलणे.
10.अक्रोध- क्षमा केल्यावर देखील अपमान झाल्यास क्रोध न करणे.
 
दहा पाप कर्म-
1. दुसर्‍यांचे धन हिसकावण्याची इच्छा.
2. निषिद्ध कर्म (मन ज्याची परवानगी देत नाही) करण्याचा प्रयत्न.
3. देहाला सर्वस्व गृहीत धरणे
4. कठोर वचन बोलणे.
5. खोटं बोलणे.
6. निंदा करणे.
7. बडबड (विना कारण बोलणे).
8. चोरी करणे.
9. तन, मन, कर्म याने दुसर्‍यांना दु:ख देणे.
10. पर-स्त्री किंवा पुरुषाशी संबंध ठेवणे.