शुभ आणि मंगळ कार्यात अतिशुभ असणारे पंचपल्लव
हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात घराच्या सभोवताली लावलेले झाडे देखील आपल्या जीवनावर प्रभाव पाडतात. म्हणून हे बघणं आवश्यक असतं की कोणती झाडे लावलेली आहे आणि कोणती झाडे लावायची आहे. असे म्हणतात की घरात दुधारी फळे असणारे झाडे आणि काटेरी झाडे लावू नये. दुधारी झाडे धनहानी, फळांची झाडे अपत्य हानी आणि काटेरी झाडे शत्रू भय करतात. या झाडांचे लाकूड देखील घरात ठेवणे शुभ नसतं.
* अत्यंत शुभ पंचपल्लव -
पिंपळ, आंबा, वड, औदुंबर, पाकडं या झाडांच्या पानाला पंचपल्लव म्हणतात. कोणत्याही शुभ कार्यात या झाडांची पाने कलशात स्थापित केल्या जातात. किंवा पूजा आणि इतर मंगळ आणि शुभ कार्यात यांचा इतर पद्धतीने वापर होतो.
* चार विशेष झाडे -
पिंपळ, वड, कडुलिंब आणि केळीच्या झाडाला देवाचे रूप मानतात. पिंपळात विष्णू, वडाच्या झाडात शंकर आणि कडुलिंबाच्या झाडात ब्रहमांचे वास्तव्य आहे तसेच केळी च्या झाडात श्री गणेशाचे वास्तव्य मानले गेले आहे. प्रत्येक धार्मिक कार्यात या झाडांचे वापर केले जाते. घराच्या अंगणात या झाडांच्या व्यतिरिक्त तुळस, अशोक,
चंपा, चमेली आणि गुलाबाच्या झाडांची लागवड केली पाहिजे. हे अतिशय शुभ सांगितले आहेत.
केळीचे झाड सर्वात शुभ मानले जाते. केळीची उपासना केल्यानं घरात शांतता आणि लक्ष्मी नांदते. केळीला साक्षात नारायणाचे रूप मानले आहे म्हणून केळीचे खांब पूजेत किंवा लग्नमांडवात लावतात. केळीची पूजा केल्यानं गुरुचे दोष देखील नाहीसे होतात. काही ठिकाणी म्हणजे घरात केळीचं रोपटं घरात ठेवू नये. असे म्हणतात की हे घरात लावल्यानं गृहस्वामीच्या उन्नतीत अडथळा आणतो. केळीचे झाड नेहमी अंगणातच लावावे. असे शास्त्र आहे.
* कोणत्या दिशेने लावावे -
घराच्या अंगणात पूर्वीकडे पिंपळ, पश्चिमेकडे वड, उत्तरेकडे औदुंबर आणि दक्षिणेकडे पाकडं लावावे. हे शुभ असतं. पण हे झाडे घरापासून लांब लावावे. जेणे करून या झाडांची सावली देखील भर दुपारी घरावर पडता कामा नये.