देव दिवाळी कधी साजरी करतात, काय आहे कारण जाणून घ्या
धार्मिक ग्रंथानुसार देव दिवाळीचा सण दिवाळीच्या पंधरा दिवसानंतर साजरा करतात. हा कार्तिक पौर्णिमेचा सण आहे. हा सण वाराणसीत धडक्याने साजरा केला जातो. जगातील सर्वात जुने शहर काशीची ही संस्कृती आणि परंपरा आहे. हा सण काशीच्या ऐतिहासिक गंगेच्या घाटांवर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात.
अशी आख्यायिका आहे की कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला सगळे देव दिवाळी साजरी करतात आणि याच दिवशी देवांनी काशीत प्रवेश केला होता. याच्या संदर्भात 2 कहाण्या आहे.
पहिली कहाणी -
या कथेनुसार भगवान शंकराने देवांच्या विनवणीवर सर्वांचाच छळ करणाऱ्या राक्षस त्रिपुरासुराचा वध केला होता. ज्याचा आनंद त्यांनी दिवाळीचा सण साजरा करून केला, जी नंतर देव दिवाळी म्हणून ख्यात झाली.
दुसरी कहाणी -
या कथेनुसार त्रिशंकूला राजर्षी विश्वामित्राने आपल्या सामर्थ्यानेने स्वर्गात नेले. सगळे देवता फार चिडले आणि त्यांनी त्रिशंकूला स्वर्गातून हाकलून दिले. त्रिशंकूला शाप मिळाल्या मुळे ते मध्यातच लोंबकळतंच राहिले. त्रिशंकूला स्वर्गातून हाकलल्यामुळे संतप्त झालेल्या विश्वामित्राने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्गापासून मुक्त असे एक नवीन विश्व निर्माण करण्यास सुरू केले.
त्यांनी कुश, माती, उंट, बकरी, मेंढ्या, नारळ, कोहळा, शिंगाडा इत्यादींची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू केली. याच अनुक्रमे विश्वामित्राने विद्यमान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची मूर्ती तयार करून त्यांच्यामध्ये प्राण टाकण्यास सुरवात केली. या मुळे संपूर्ण सृष्टी हादरली आणि सर्वत्र गोंधळ उडाले. या गोंधळलेल्या सर्व देवांनी राजर्षी विश्वामित्र यांना विनवणी केली. महर्षी प्रसन्न झाले आणि त्यांनी
नवीन विश्व निर्माण करण्याचे संकल्प मागे घेतले. सर्व देव आणि ऋषीमुनी आनंदी झाले पृथ्वी, पाताळ, स्वर्गात सर्व जागी दिवाळी साजरी केली गेली. याच प्रसंगाला देव दिवाळी म्हणून देखील ओळखलेले जाते.